• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत आता 227 वॉर्डच असणार; ठाकरे गटाला हायकोर्टाचा दणका…

Yes News Marathi by Yes News Marathi
April 17, 2023
in इतर घडामोडी
0
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत आता 227 वॉर्डच असणार; ठाकरे गटाला हायकोर्टाचा दणका…
0
SHARES
1
VIEWS

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बृहन्मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या वाढवण्याचा निर्णय रद्द करून ती पूर्वरत प्रभाग रचना करण्याच्या राज्य सरकारच्या नव्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं दिलेलं आव्हान फेटाळून लावण्यात आलं आहे. या याचिकेत कोणतंही तथ्य नसल्यानं ती फेटाळून लावत असल्याचं हायकोर्टानं आपल्या निकालात म्हटलंय. न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली होती. त्यानंतर 17 जानेवारी 2023 रोजी राखून ठेवलेला आपला निकाल या खंडपीठानं सोमवारी दुपारी ऑनलाईन सुनावणीत जाहीर केला. न्यायमूर्ती चंदवानी हे सध्या नागपूर खंडपीठात कार्यरत असल्यानं ते तिथून ऑनलाईन या निकाल वाचनासाठी उपस्थित होते.

जनगणनेनुसार लोकप्रतिनिधींच्या जागांची संख्या वाढू शकते, असं मानल्यास भारताची लोकसंख्या वाढली म्हणून लोकसभेच्या जागा वाढल्या का? असा प्रश्न राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी हायकोर्टात उपस्थित केला होता. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग संख्या 236 वरून पुन्हा 227 करण्याच्या विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ही कायद्याचा चुकीचा अर्थ लावून करण्यात आल्याचा दावाही महाधिवक्त्यांनी हायकोर्टात केला. जनगणनेच्या आधारावर प्रभागसंख्या कमी जास्त करता येणार नाही. नगरसेवकांची संख्या किती असावी?, हे कायद्यानं निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पालिका प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेला हात लावण्याची गरज नव्हती. नगरसेवकांची संख्या ही कायद्यानं निश्चित केलेली असल्यानं लोकसंख्या वाढली म्हणून नगरसेवकांची संख्या वाढली पाहिजे असा नियम नाही, मुंबई महानगरपालिकेच्या साल 2012 आणि 2017 सालच्या निवडणुका या 2011 सालच्या जनगणनेनुसारच घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे नवीन जनगणनेअभावी आगामी निवडणुकांसाठी प्रभाग संख्या वाढवण्याची गरज नाही असं महाधिवक्त्यांनी स्पष्ट केलं होतं.

बृहन्मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांची नव्यानं प्रभाग रचना करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांत 9 ने वाढ होऊन ती 236 करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यानच्या काळात राज्यात राजकीय सत्तांतर झालं. शिवसेनेतून शिंदे गटानं बंड पुकारून भाजपासोबत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. या नव्या सरकारनं मविआ सरकारनं प्रभागांच्या सीमा रचनेबाबत घेतलेला निर्णय 8 ऑगस्ट 2022 च्या बैठकीत रद्द करून पालिकेच्या प्रभागांची संख्या 236 वरून पुन्हा 227 करत तसा अध्यादेश जारी केला. या अध्यादेशाला ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं.

गेल्या वर्षी तत्कालीन मविआ सरकारनं बृहन्मुंबई महापालिकेची प्रभागाची पुनर्रचना करून प्रभाग संख्या ती 227 वरुन 236 पर्यंत वाढवली. शिवसेनेतून शिंदे गटानं बाहेर पडून भाजपाशी हात मिळवणी करून नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर मविआ सरकारचा निर्णय बदलून प्रभाग संख्या पूर्ववत 227 केली. या निर्णयामुळे बृहन्मुंबई महापालिकेची आधीच रखडलेली निवडणूक आणखी लांबणीवर पडणार आहे. तसेच याचा सरकारी तिजोरीलाही मोठा फटका बसणार आहे, असा दावा करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांच्यावतीनं याचिका दाखल केलेली होती.

Previous Post

अभिनेत्री पूजा हेगडेने नुकतेच फॅशनेबल फोटोशूट पोस्ट केले आहे

Next Post

रकुल प्रीत सिंगने आता ताज्या फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
रकुल प्रीत सिंगने आता ताज्या फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे

रकुल प्रीत सिंगने आता ताज्या फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026