• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चुलीवरील बाबांचे पितळ उघडे पडताच बाबाने गावातून ठोकली धूम

Yes News Marathi by Yes News Marathi
March 26, 2023
in इतर घडामोडी
0
चुलीवरील बाबांचे पितळ उघडे पडताच बाबाने गावातून ठोकली धूम
0
SHARES
1
VIEWS
  • अमरावती : सध्या अंधश्रद्धेचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान देताच अनेकांची धांदल उडाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. असाच एक प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आलेला आहे. चुलीखाली लाकडे पेटवून त्यावर गरम झालेल्या तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद आणि घाणेरड्या शिव्या देणाऱ्या महाराजाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिले. यानंतर महाराजांची आता चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. चुलीवरचा बाबा अशा नव्या नावाने सध्या या बाबाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
  • या व्हिडिओमध्ये चुलीवर बसलेल्या बाबाच्या भोवताली काही लोक जमले असल्याचे दिसत आहे. या बाबाचे असे विचित्र नाटक असणारा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी या बाबाचे नामकरण चुलीवरचा बाबा असे देखील केले. चुलीवर बसणाऱ्या भोंदू बाबाचा हा प्रकार अमरावतीपासून 17 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मार्डी गावात सुरू आहे. हा बाबा स्वतःला सच्चिदानंद गुरुदास महाराज असे म्हणून घेतो. त्याचे खरे नाव सुनील कावलकर आहे. तो पूर्वी मजुरी काम करायचा. आता पंधरा वर्षांपासून त्याने स्वतःला बाबा घोषित केले आहे. या बाबांनी आता चक्क चुलीवर बसण्याचा प्रताप केला आहे.
  • पेटलेल्या चुलीवर मोठा तवा ठेवून त्यावर मांडी घालून बसणाऱ्या या बाबाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या गरम तव्यावर तब्बल पाच मिनिटे बसून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. या बाबाने हे आव्हान स्वीकारले तर त्याला तीस लाख रुपये देणार अशी घोषणा देखील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. हे आव्हान स्वीकारल्यावर बाबाला चटका बसू नये, जर बाबाला चटका बसून इजा झाली, तर त्यासाठी बाबा जबाबदार राहील असे देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्पष्ट केले आहे.
  • दरम्यान चुलीवर बसणाऱ्या बाबाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बाबाला आव्हान देताच, या बाबाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कथित बाबा म्हणाले मार्डी परिसरात 24 वर्षांपासून मी समाजसेवेचे काम करतो. या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्वावर भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी भागवत सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी अचानक मी माझो भान हरपले. पेटलेल्या चुलीवरील गरम तव्यावर जाऊन बसलो.
  • या प्रकाराचा व्हिडिओ कोणीतरी काढून व्हायरल केला. माझा स्वतःचा अंधश्रद्धेवर विश्वास नाही, मी संत गाडगेबाबांना मानणारा व्यक्ती आहे. माझे गोसेवेचे काम आहे. समाज माध्यमांवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ त्वरित काढण्यात यावा, अशी मागणी देखील या बाबाने केली आहे. मी कुठलाही चमत्कार केला नाही, असे स्वतः बाबांनी वायरल केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले असताना त्याच व्हिडिओमध्ये हा चमत्कार देखील आहे, असे वक्तव्य देखील केले आहे. एकूणच व्हायरल व्हिडिओमुळे जगासमोर आलेला हा भोंदू बाबा आता मार्डी गावातून पसार झाला आहे.
Previous Post

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या लोहा येथील सभेत एक लाख क्षमतेचा मंडप अन् १०० कुलर

Next Post

सोलापुरात वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांना आर.टी.ओ. चा दणका

Related Posts

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा
इतर घडामोडी

निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा

September 17, 2026
भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा
इतर घडामोडी

भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी रांगोळी
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी रांगोळी

September 17, 2026
Next Post
सोलापुरात वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांना आर.टी.ओ. चा दणका

सोलापुरात वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांना आर.टी.ओ. चा दणका

ताज्या बातम्या

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026