येस न्यूज नेटवर्क: नेपाळमधील भीषण पूर आणि भूस्खलनामुळे जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले असून वीज निर्मिती क्षमता घटली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने नेपाळला १३ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत दररोज १८ तासांपर्यंत ६५४ मेगावॅटपर्यंत वीज निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे.
यापैकी ६०० मेगावॅट वीज मुजफ्फरपूर–ढलकेबर ४०० केव्ही मार्गाने, तर ५४ मेगावॅट टनकपूर–महेंद्रनगर मार्गाने दिली जाणार आहे. पुरवठ्याचा कालावधी दररोज मध्यरात्री १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असेल.नेपाळमधील पुरामुळे सुमारे डझनभर जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले असून देशाला अतिरिक्त वीजेची गरज निर्माण झाली आहे. भारताच्या या निर्णयामुळे नेपाळमधील वीजटंचाई कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी २०२७ नंतरच्या वीजपुरवठ्याबाबत डिसेंबरमध्ये आढावा घेतला जाणार आहे.










