• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज ठाकरेंनी मजारवरील कारवाईनंतर शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानत दक्ष राहण्याचं केले आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 24, 2023
in इतर घडामोडी
0
राज ठाकरेंनी मजारवरील कारवाईनंतर शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानत दक्ष राहण्याचं केले आवाहन
0
SHARES
2
VIEWS
  • मुंबई – बुधवारी मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यामध्ये पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत
    बांधकांमाचा मुद्दा उपस्थित केला. मुस्लिम समाजातील काही लोकांनी अनधिकृतपणे मुंबईतील माहीमच्या समुद्रासहीत, सांगलीमध्येही काही अनधिकृत बांधकाम केल्याचे पुरावे सादर करत यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर 24 तासांच्या आत कारवाई करत ही अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. या कारवाईनंतर राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदवली आहे. महीममधील मजारीचा आधीचा आणि नंतरचा फोटो शेअर केला आहे. राज यांनी प्रशासनाबरोबरच मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी हिंदू बांधवांनाही एक आवाहन केलं आहे.
  • राज यांनी दिलेलं आव्हान
    राज ठाकरेंनी माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याजवळ समुद्रात केलेल्या बांधकामाचे ड्रोन फुटेज दाखवले होते. “माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याजवळ समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं. 2 वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. माहीम पोलीस स्टेशन तिथे जवळ आहे. पण त्यांनी दुर्लक्ष केलं. महानगरपालिकेचे लोक फिरत असतात त्यांचं लक्ष नाही. दिवसाढवळ्या हे सुरु आहे आणि तरीही पोलीस, महापालिका ह्यांना दिसलं नाही?” असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. “माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ह्यांना विनंती आहे की हे पाहिल्यावर तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. एका महिन्याचा अल्टीमेटम देतोय. नाहीतर त्याच्याबाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जे होईल ते होईल,” असं म्हणत राज यांनी थेट प्रशासनाला आव्हान दिलं होतं.
  • आता मानले आभार
    “सस्नेह जय महाराष्ट्र! धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना धक्का बसला. तात्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई केली त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चेहेल, सांगली मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो,” असं राज ठाकरेंनी पोस्टच्या पहिल्या परिच्छेदात म्हटलं आहे.
  • केलं आवाहन
    “आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्रमणं राज्यभर सुरु आहेत, लक्षात घ्या हे फक्त अतिक्रमण नव्हे तर धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे आक्रमणच आहे त्यावर वेळीच उपाययोजना नाही झाली तर हेच आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांधवानेही दक्ष राहायलाच हवं,” असं आवाहनही राज यांनी केलं आहे.
Previous Post

सोलापुरात राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावयाचे आयोजन

Next Post

शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या महान क्रांतिकारकांना जिल्हा परिषदेत अभिवादन

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या महान क्रांतिकारकांना जिल्हा परिषदेत अभिवादन

शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या महान क्रांतिकारकांना जिल्हा परिषदेत अभिवादन

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026