• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पंतप्रधान मोदींना पाणीपुरीचा मोह अनावर, जपानच्या पंतप्रधानांसह मारला पाणीपुरीवर ताव, लस्सीचाही आस्वाद

by Yes News Marathi
March 21, 2023
in मुख्य बातमी
0
पंतप्रधान मोदींना पाणीपुरीचा मोह अनावर, जपानच्या पंतप्रधानांसह मारला पाणीपुरीवर ताव, लस्सीचाही आस्वाद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. किशिदा यांनी यावेळी भारतीय अन्न पदार्थांचा आस्वाद घेतला.
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना पाणीपुरी खाऊ घातली आणि स्वत:ही पाणीपुरीवर ताव मारला. यावेळी त्यांनी लस्सीचाही आस्वाद घेतला.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सोमवारी दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भारत दौऱ्यावर आलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कला भेट दिली..
जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी दौऱ्यावेळी भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला. हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.
दोन्ही नेत्यांनी बुद्ध जयंती पार्कमधील बाल बोधी वृक्षाला भेट दिली. यानंतर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि पंतप्रधान मोदी यांनी येथे पाणीपुरी, लस्सी आणि कैरी पन्हाचा आस्वाद घेतला.
यावेळी पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी कोविड-19 महामारीनंतर शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध जगासाठी भारत-जपान धोरणात्मक भागीदारीचा विस्तार करण्यासाठी व्यापक चर्चा केली.
पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा परदेशी मान्यवरांना भारतातील विविध राज्ये आणि प्रदेशांच्या सांस्कृतिक आणि कलात्मक समृद्धी दर्शवणाऱ्या भेटवस्तू दिल्या आहेत.
यावेळी पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना ‘कदमवुड जाली बॉक्स’ म्हणजेच कदंब लाकडापासून बनवलेला बॉक्समध्ये चंदनाची बुद्ध मूर्ती भेट दिली. ही मूर्ती कर्नाटकातील चंदनाच्या लाकडापासून बनवण्यात आली आहे.

Previous Post

फिफा विश्वचषक गाजवलेला कायलिन एम्बाप्पे आता फ्रान्स फुटबॉल संघाचा कर्णधार होणार; लवकरच घोषणा

Next Post

आता सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार !

Next Post
आता सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार !

आता सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार !

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group