काँग्रेस नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णालय प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर डॉ. अरुप बासू आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, सर गंगाराम रुग्णालय प्रशासनाने माहिती देत सांगितलं आहे की, सोनिया गांधी यांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या विविध चाचण्या सुरू आहेत, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितलं आहे.