- सोलापूर : सोलापूर स्मार्ट सिटी योजने अंतर्गत, स्काडा नियंत्रण प्रणालीचे काम प्रगतीपथावर आहे. ही कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी शटडाऊन राहणार असून यामुळे सोलापूर शहरातील पाणीपुरवठा दि. 10 फेब्रुवारी 2023 ते पुढील 25 दिवसापर्यंत 3 ऐवजी 4 दिवसानंतर होणार आहे. 4 दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.
- दरम्यान, या कालावधीत पाणी पुरवठा चार दिवसआड नंतर देखील उशीरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी केले आहे.