दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 12.55 च्या सुमारास एका व्यक्तीने दिल्ली पोलिसांना कॉल करत अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १२:०५ वाजता आरोपींनी अरविंद केजरीवाल यांना पीसीआर कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली. कॉल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येऊन तपास केला. त्यानंतर काही वेळातच तो पकडला गेला. मात्र, आरोपीवर दिल्लीतील गुलाबीबाग येथे उपचार सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही.