• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पथनाट्यातून समाज प्रबोधन, समूहगीतातून देशभक्तीचा जागर

Yes News Marathi by Yes News Marathi
January 4, 2023
in इतर घडामोडी
0
पथनाट्यातून समाज प्रबोधन, समूहगीतातून देशभक्तीचा जागर
0
SHARES
1
VIEWS

उत्कर्ष महोत्सवात लोकगीतांवर तरुणाई थिरकली

सोलापूर, दि.4- स्त्री अत्याचार, पुरुषप्रधान संस्कृती, स्त्री-पुरुष समानता, जातीयवाद, धर्मवाद, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी यासोबतच राज्यातील सत्तांतर महानाट्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईने पथनाट्यातून टीकास्त्र सोडत समाज प्रबोधन केले. समूहगीतामधून देशभक्तीचा जागर झाला तर लोकगीतांवर महोत्सवातील तरुणाईने मनसोक्त नाचत आनंद द्विगुणीत केला.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सवाचे आयोजन सोलापूर विद्यापीठात करण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आणि कुलसचिव योगिनी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी विद्यापीठ कॅम्पसमधील हॉलीबॉल मैदानावर पथनाट्याच्या स्पर्धा रंगल्या. त्यानंतर सामाजिक निबंध स्पर्धा पार पडले तर दुपारी मुख्य रंगमंचावर समूहगीताच्या स्पर्धा खूपच जल्लोषात झाल्या. सायंकाळी भितीचित्र आणि वक्तृत्व स्पर्धा पार पडले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरितीने ‘प्रश्न विचारायलाच हवे’ या विषयावर पथनाट्य सादर करीत महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प अन्य राज्यात गेले, राज्यातील सत्तांतर यासोबतच भगव्या रंगाच्या बिकिनीची चर्चा, प्रसार माध्यमांचे अस्तित्व धोक्यात आदी विषयांना स्पर्श केले. या विद्यार्थ्यांनी जोरदार तयारी करूनच मैदानात उतरण्याचे दिसून आले. संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पाणी या विषयावर खूप चांगल्या रीतीने पथनाट्य सादर केले. वेळीच पाण्याचे महत्व ओळखावे, याबाबत जनजागृती करत दुर्लक्ष केले तर भविष्यात परिस्थिती वाईट असेल असा संदेश त्यांनी यावेळी दिला. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अवयदानावर पथनाट्य सादर करीत जनजागृती केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देखील सादर केलेल्या पथनाट्याला प्रेक्षकांनी दाद दिली. सर्व तेरा विद्यापीठांनी यामध्ये सहभाग नोंदविला.

समूहगीत स्पर्धेत तेरा विद्यापीठांनी सहभागी होत देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी लोकगीते देखील सादर करीत विद्यार्थ्यांनी महोत्सवात जोश निर्माण केला. यामुळे संपूर्ण विद्यापीठात उत्साहाचे वातावरण संचारले होते.

चौकट
फोटोग्राफी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सवात फोटोग्राफी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. राज्यातील तेरा विद्यापीठांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. महोत्सवाच्या सुरुवातीपासून शेवटच्या दिवसापर्यंत फोटो काढून त्यातील निवडक पंधरा फोटो स्पर्धकांनी बुधवारी सायंकाळी संयोजकांकडे सोपविले. त्याचे परीक्षण झाले असून उद्या सर्व स्पर्धेचा निकाल कळेल व समारोप समारंभात पारितोषिके वितरण होईल.

Previous Post

माऊली महाविद्यालय वडाळा येथे सायबर सिक्युरिटी जनजागृती कार्यक्रम संपन्न

Next Post

रकुल प्रीत सिंगने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

Related Posts

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात
इतर घडामोडी

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026
महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!
इतर घडामोडी

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

October 21, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद
इतर घडामोडी

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद

October 21, 2026
सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा…ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार
इतर घडामोडी

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा…ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार

October 21, 2026
कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम
इतर घडामोडी

कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम

October 21, 2026
पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद
इतर घडामोडी

पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद

October 21, 2026
Next Post
रकुल प्रीत सिंगने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

रकुल प्रीत सिंगने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

ताज्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

October 22, 2026
पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

October 22, 2026
सद्दाम आमलीचुंगे खून प्रकरणातील एकूण १५ आरोपी अटकेत

सद्दाम आमलीचुंगे खून प्रकरणातील एकूण १५ आरोपी अटकेत

October 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026