कोविड काळात निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना धनादेश कोविड काळात कर्तव्यावर असताना कोविड१९ ने निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांचे धनादेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देण्यात आले.कोतवाल उद्धवसिंग राजपूत आणि मंगळवेढा तहसील कार्यालयातील महसूल सहायक डी. टी. घाडगे यांच्या कुटुंबाला धनादेश देण्यात आले.यावेळी , जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप आदी उपस्थित होते.