येस न्युज मराठी नेटवर्क : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही लतादीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. लता मंगेशकर यांचा सुमधुर आवाज अजरामर आहे. त्यांचा आवाज चाहत्यांच्या हृदयात कायम राहील, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिली आहे. आपल्या लोकप्रीय आवाजाने त्यांनी चाहत्यांची मने जिंकली असल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांच्या दु:खात मी संवेदना व्यक्त करत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.