Yes News Marathi Network : देशात करोना महामारीची तिसरी लाट आली असून, सर्वसामान्यांपासून ते अगदी मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
राजनाथ सिंह यांनी स्वत: ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. माझी आज सौम्य लक्षणांसह करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी स्वत:चे विलगीकरण करून घ्यावे आणि तपासणी करून घ्यावी. असं राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे.










