• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यातील पक्षी संवर्धनासाठी शासनाकडून करणार सर्वतोपरी सहकार्य – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
January 7, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यातील पक्षी संवर्धनासाठी शासनाकडून करणार सर्वतोपरी सहकार्य – पालकमंत्री दत्तात्रय भरणे
0
SHARES
0
VIEWS

राज्यस्तरीय पक्षी मित्र संमेलनातील कार्यशाळेचे उद्घाटन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात तब्बल ३७३ प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती आढळतात. या सर्व प्रजातींच्या संरक्षण आणि संवर्धन करण्याकरिता शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करु असे पआश्वासन वनराज्यमंत्री आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. डॉ. मेतन फाऊंडेशनच्यावतीने सामाजिक वनीकरण सोलापूर आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या सहकार्याने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित तीन दिवसीय ३४ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाच्या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.

यावेळी व्यासपीठावर डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. निनाद शहा, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, विभागीय वन अधिकारी मनिषा पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, उजनी, हिप्परगा आणि कुरनूर धरण या ठिकाणांसह जिल्ह्यात पक्ष्यांच्या ३७३ प्रजाती, फुलपाखरांच्या १०० प्रजाती तर वन्यप्राण्यांच्या ३० प्रजाती आढळतात. शासनाकडुन गवत लागवड कार्यक्रम, पाणवठे तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे जैव विविधता वाढत आहे, असेही पालकमंत्री श्री. भरणे यांनी सांगितले.

पक्षीमित्र संमेलनात शुक्रवारी दोन कार्यशाळा झाल्या. जखमी पक्ष्यांवर उपचार आणि निगा कशी राखावी या विषयावरील कार्यशाळेत डॉ. शिवानी तांडेल (मुंबई), डॉ. संजय गायकवाड (नाशिक) आणि राजकुमार कोळी (सोलापूर) यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. तांडेल म्हणाल्या, जखमी पक्षी आढळला की त्याच्या शरीरात पाणी गेले आहे का, श्वास नीट घेत आहे ना, रक्तस्त्राव झाला आहे का ही प्राथमिक पण अत्यंत महत्वाची माहिती डॉक्टरांना द्यावी. पक्षी हे जैव विविधतेचे प्रतिके आहेत.

डॉ. गायकवाड म्हणाले, जखमी पक्ष्यावर उपचार केल्यानंतर तो उडू शकत असेल तर त्याला लगेच निसर्गात सोडावे. जर त्याला खूप दिवस आपल्याकडे ठेवले तर नैसर्गिक खाद्य न मिळाल्यामुळे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. राजकुमार कोळी म्हणाले, सोलापूर शहर आणि परिसरात सुमारे २५० प्रकारचे पशू-पक्षी आढळतात. मांजा, प्लास्टिक, कीटकनाशक औषधे यांच्या अधिक वापरामुळे पशू-पक्ष्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होत आहे. हे रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय होण्याची आवश्यकता असल्याचेही कोळी म्हणाले.

तसेच फोटो एडिटिंग कार्यशाळेत बंगळुरू येथील अनंत मूर्ती, आनंद मादास, अरुण सामक यांनी मार्गदर्शन केले. नैसर्गिक अधिवासातील पशू पक्ष्यांचे फोटो कसे घ्यावेत, ते संपादित कसे करावेत याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी प्रास्ताविक केले.अभिज भानप यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

निसर्गनिर्मित, मानवनिर्मित संकटांमुळे पक्षी धोक्यात येत आहेत. यावर उपाय म्हणून पक्षीमित्र कार्य करतात. पक्ष्यांसाठी तालुका पातळीवर रेस्क्यू सेंटर व्हावे अशी मागणी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. निनाद शहा यांनी यावेळी पालकमंत्र्यांना केली.

Previous Post

रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षेवर अधिक भर देणे आवश्यक -ॲड.अनिल परब

Next Post

पालकमंत्री भरणे यांची मार्डी येथील मृत मुलींच्या कुटुंबाला भेट

Related Posts

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!
मुख्य बातमी

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
Next Post
पालकमंत्री भरणे यांची मार्डी येथील मृत मुलींच्या कुटुंबाला भेट

पालकमंत्री भरणे यांची मार्डी येथील मृत मुलींच्या कुटुंबाला भेट

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026