सोलापूर : श्री बृहन्मठ होटगी संस्था संचलित श्री वीरतपस्वी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ७५ कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला शाळेच्या शिक्षिका लावण्या कुरापाटी यांनी आपल्या प्रास्ताविकेत सूर्यनमस्कारा विषयी माहीती दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी कंदिकटला यांनी विध्यार्थ्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी रोज सूर्यनमस्कार करावे असे सांगीतले. त्यांनी आपल्या मनोगतात सूर्यनमस्कारा विषयी माहीती दिली. यानंतर प्रज्ञा सग्गम या विध्यार्थीनीने सर्व विध्यार्थ्यांना ७५ कोटी सूर्यनमस्कारांनी राष्ट्रवंदना म्हणून शपथ दिली. व शाळेचे क्रीडा शिक्षक श्री सुहास मुदगल यांनी सर्व विध्याथ्र्यांनकडून १३ सूर्यनमस्कार करून घेतले.
अशा प्रकारे मोठ्या उत्साहात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ७५ कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व मान्यवरांचे आभार सौ लावण्या कुरापाटी यांनी केले.