सोलापूर : केगाव प्रशिक्षण केंद्रातील पोलिस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांची शहरात बदली झाली आहे. राज्यातील पोलिस निरीक्षक व फौजदार यांच्या बदल्या आहेत. त्यात शहर व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. श्रीमती कुर्री औरंगाबाद ग्रामीणचे सय्यद शौकत साबी यांची सोलापूर शहरात, हिंगोली येथून निरीक्षक कृष्णदेव पाटील हे सोलापूर ग्रामीणमध्ये, नागपूर येथून दीपक पाटील यांची प्रशिक्षण केंद्र (केगाव) येथे बदली झाली. शहर आयुक्तालयातील निरीक्षक प्रवीण पाटील यांची गुन्हे अन्वेषण विभाग, संजय पाटील यांची प्रशिक्षण केंद्र (तुरची, सांगली)येथे, केगाव प्रशिक्षण केंद्रातील अरुण आव्हाड यांची अहमदनगर येथे, तर ग्रामीणचे संतोष गिरीगोसावी यांची दौंडच्या प्रशिक्षण केंद्रात बदली झाली.