सोलापूर : बालाजी अमाईन्सच्यावतीने अकोलेकाटी येथिल शिवप्रभु माध्यमिक प्रशाला येथे बांधण्यात आलेल्या विज्ञान प्रयोगशाळेचे उदघाटन बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांच्या हास्ते करण्यात आले . सोलापूर जिल्हयातील १४ शाळा व १ वाचनालयास शालोपयोगी साहित्य व स्पर्धा परिक्षा पुस्तकांचे वितरण सोहाळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बरडे, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत उपशिक्षण अधिकारी सुलभा वठारे, बालाजी अमाईन्सचे संचालक काशिनाथ ढोले, अकोलेकाटी गावाचे सरपंच भाऊसाहेब लामकाने, उपसरपंच देविदास लामकाने पोलिस पाटिल, बापूसाहेब पाटिल सर्व शाळांचे मुख्याध्यापक व पालक उपस्थित होते. यावेळी राम रेड्डी यांनी व उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
माजी शिक्षक आमादार दत्तात्रय सावंत यांनी बालाजी अमाईन्स ने सर्व क्षेत्रात सामाजिक कार्य चांगले केले आहे त्या कार्यास तोड नाही असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमास १४ शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक पालका अकोलेकाटी गावतील ग्रामस्थ उपस्थित होते . शिवप्रभु माध्यमिक प्रशालाचे मुख्याध्यपक शंकर वडणे यांनी सर्वांचे आभार मानले.