सोलापूर : भारताचे थोर सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर मानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ.कोटणीस यांना महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सोलापूर महापालिकेच्या कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विभागीय अधिकारी तपन डंके,जयप्रकाश अमनगी,शिवकुमार धनशेट्टी,सुरेश लिंगराज,सिद्धू तिमिगार, अशोक खडके, आदी मान्यवर उपस्थित होते.