• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर : पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आरपीआय, भाजप किसान मोर्चा आक्रमक

Yes News Marathi by Yes News Marathi
December 8, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर : पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आरपीआय, भाजप किसान मोर्चा आक्रमक
0
SHARES
0
VIEWS
  • पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात पंढरपुरात निदर्शने
  • पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात तात्काळ कारवाई करा : दिपक चंदनशिवे

पंढरपूर : सोलापूर पुनर्वसन विभागाचे अधिकारी व दलालांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचारा बाबत आरपीआय, भाजप किसान मोर्चाच्या वतीने पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर निदर्शने आणि हलगी नाद आंदोलन दिपक चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनादरम्यान पुनर्वसन विभागाच्या तात्कालीन अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी आरपीआय,भाजपा किसान मोर्चा आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले.

सोलापूर पुनर्वसन विभागात प्रकल्प ग्रस्तांच्या मिळालेल्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात साखळी तयार झाली आहे. दलाल व अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केले जात आहेत. अशा वाढत्या प्रकरणांमुळे तत्कालीन पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांच्याविषयी प्रकल्पग्रस्तातून नाराजी व्यक्त केली जात होती.
सातारा,पुणे व इतर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पंढरपूर,मंगळवेढा माळशिरस,माढा, करमाळा या भागात पुनर्वसन करून त्यांना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. लाभार्थ्यांचा शोध घेऊन सदर व्यवहारात मिलीभगत करून कमी किमतीत जमिनीची खरेदी करून दाम दुप्पट दराने जमीन विक्री केली जात आहे. यामुळे सर्व सामान्य प्रकल्पग्रस्तांना व इतर शेतकऱ्यांना जादा आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्यामुळे काही पुनर्वसन खरेदी,विक्री व्यवहारही रद्द झाले असल्याचे आदेशही निघाले आहेत. काही प्रकल्पग्रस्तांच्या एकाच आदेशावर दोन-दोन ठिकाणी जमिनी खरेदी करून झालेल्या आहेत तर काही जमिनी खरेदी विक्रीच्या प्रकरणांचे कोर्ट केस असताना विक्री झालेल्या आहेत तरी काही खरेदी-विक्री केलेल्या जमिनीत शासकीय अनुदानाचा लाखो रुपयांचा लाभही घेतला आहे. आशा सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून खातेनिहाय व मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आरपीआयचे दिपक चंदनशिवे यांनी केली होती.
याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुणे विभागीय आयुक्तांना प्रकरणनिहाय सखोल चौकशी करून १५ दिवसात स्पष्ट अहवाल सादर करावा असे आदेश २८ सप्टेंबर २०२१ रोजी दिला होता. परंतु कोणतीही कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी आरपीआय, भाजपा किसान मोर्चाच्या वतीने पंढरपूर तहसीलसमोर निदर्शने आणि हलगी नाद आंदोलन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने लोक कलावंत तसेच प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सामील झाले होते.
या आंदोलनात महिलांची संख्या लक्षवेधी ठरली.
यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी सुरेश नवले, नितीन काळे, संतोष ननवरे, विजयकुमार खरे, दत्ता वाघमारे,पिंटू कांबळे, भास्कर चंदनशिवे, अनिल चंदनशिवे, समाधान बाबर, राजकुमार भोपळे, परशुराम शिंदे, महादेव सोनवणे, सय्यद पठाण, सौ.अविंदा गायकवाड, रवी भोसले, अनिल काळे, नाथा बाबर, सुजित सोनवणे, परसू शिंदे, संजय भोसले, शाहू शिंदे, कलीम पठाण आदी उपस्थित होते.

Previous Post

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बिपीन रावतही जखमी?

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला सीटूचा पाठींबा !

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला सीटूचा पाठींबा !

एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला सीटूचा पाठींबा !

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026