सोलापूर : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले असून राजेश काळे यांच्यावर सात गुन्हे दाखल होते. त्यांना सोलापूर उस्मानाबाद इंदापूर येथून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले तर सेटलमेंट भागातील रहिवासी चेतन नागेश गायकवाड यांनाही दोन वर्षासाठी सोलापूर उस्मानाबाद इंदापूर येथून तडीपार करण्यात आला आहे त्यांच्यावर खून खुनाचे प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दिली. चेतन गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र आहेत. तर उपमहापौर राजेश काळे भारतीय जनता पार्टीचे निलंबित कार्यकर्ते आहेत.