सोलापूर | रुपाभवानी मंदिरात दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख देवी मंदिरात दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे.
नोंदणीनुसार टप्प्याटप्प्याने भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मंदिर समिती व पोलिस प्रशासन वेबसाइट सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे. सोमवारी सकाळी याबाबत पोलिस प्रशासनमध्ये समन्वय बैठक आहे. यावेळी जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब भालचीम यांनी सांगितले की, सोमवारी याबाबत अंतिम बैठक नियोजन आहे. महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त बैठक होणार आहे. एका दिवशी किती जणांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. अन्य उपायोजनांबाबत नियमावली सोमवारी अंतिम स्वरूपात समोर येईल असे त्यांनी नमूद केले.