सिगारेट आरोग्यासाठी घातक असल्याचे सर्वांनाच माहिती असते परंतु कित्येक लोकांना याची जाणीव नसते की सिगरेट चा धूर सोडल्यानंतर राहिलेले सिगरेट चे थोटूक खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण करते बऱ्याच वेळा रस्त्यांच्या कडेला अशी सिगारेटची थोटके निश्चितच पाहायला मिळतात कित्येक वेळा हे अर्धवट जळालेले सिगारेटचे तुकडे रस्त्यावरील जनावरेही खातात त्यामुळे या जनावरांना त्रास होतो.
पंजाब मधील मोहाली येथे राहणाऱ्या उद्योगपती ट्विंकल कुमार यांनी या सिगारेटच्या थोटकामधून नवीन उद्योग सुरू केला आहे.

रिसायकल करून त्यांनी लहान मुलांची खेळणी, कुशन आणि डासांना पळवून लावणारे औषध तयार केले आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यावर ट्विंकल कुमार यांनी सिगारेट च्या रिसायकलिंग बाबत माहिती मिळवली व संबंधित कंपनीला संपर्क साधून त्यांनी स्वतः हे काम सुरू केले. सिगारेटचे बडस सेल्युलोज एसीटेट या नावाच्या प्लास्टिक पासून तयार होतात हे बर्ड्स पूर्णतः नामशेष होण्यास किमान दहा वर्षे लागतात . या बडसमधून निकोटिन सारखी रसायने देखील बाहेर पडतात. ट्विंकल कुमार लोकांना धूम्रपान करू नका , असाच सल्ला देतात . परंतु जर सिगारेट पीतच असाल तर त्याचा फिल्टर आजूबाजूच्या कचराकुंडीत टाकण्याचे आवाहन नाही ते सर्वांना करतात.