सोलापूर : जुने विडी घरकुल भारत नगर येथे राहणाऱ्या सुरज गुंडप्पा सुरवसे या तरुणास सोलापूर शहर जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षांकरिता तडीपार केल्याचे पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर यांनी म्हटले आहे. मोबाईल काढून घेणे, मारहाण करून पैसे घेणे, सामान्य नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवणे, आर्थिक फायदा करता घरफोडी करणे असे गंभीर गुन्हे सूरज याच्याविरुद्ध असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.











