सोलापूर : कांदा व्यापारी कडून कांदा खरेदी केल्यानंतर त्याची देणे रक्कमे वरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि.२७ जुलै रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ताज रोडलाईन्स हैदराबाद रोड सोलापूर येथे घडली. याप्रकरणी फिरोज शमशोदिन मुजावर (वय-२७,रा. संगम नगर,मुळेगाव रोड,सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून अमन कल्याणी,इम्तियाज कल्याणी, उजेब कल्याणी,नोमान कल्याणी (सर्व रा.रोडलाईन्स हैदराबाद रोड,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी फिरोज मुजावर यांच्या ओळखीचे मित्र अहमदनगर येथील कांदा व्यापारी इब्राहिम इनामदार यांच्याकडून कांदे खरेदी केले होते.त्याची देणे असलेली रक्कम दिली नाही याबाबत फिर्यादीच्या मित्राने फिर्यादीस विचारणा करण्याचे कळविले होते.त्याप्रमाणे फिर्यादी व फिर्यादीचा मित्र असे बरेच वेळा इम्तियाज कल्याणी यांच्याकडे विचारणा केली.त्यानंतर मात्र दि.२७ जुलै रोजी संशयित आरोपी अमन कल्याणी याने फिर्यादीस फोन करून इनामदार याचे देणे असलेल्या रकमेबाबत बोलू असे सांगून बोलावून घेतले.त्यावेळी फिर्यादी यांनी इम्तियाज कल्याणी याला इनामदार यांचे देणे असलेल्या पैसा बाबत विचारणा केली असता, इम्तियाज याने तुम्ही कोण आम्हाला विचारणारे असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यानंतर वरील संशयित आरोपींनी मिळून फिर्यादी व फिर्यादीचा मित्र यांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.दरम्यान कल्याणी याने तेथे पडलेली लाकडी काठी हातात घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मुजावर हे करीत आहेत.
