• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अनिल देशमुख प्रकरणात दोन बडे अधिकारी ?

by Yes News Marathi
July 28, 2021
in इतर घडामोडी
0
अनिल देशमुख प्रकरणात दोन बडे अधिकारी ?
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्यानंतर याप्रकरणी हायकोर्टाच्या आदेशाने सीबीआय व ईडी यांच्याकडून चौकशी सुरू असून आज सीबीआयने मोठी कारवाई केली.

सीबीआयकडून मुंबई, ठाणे, पुणे नाशिक आणि अहमदनगर या शहरांतील १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून त्यात दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांचीही झडती घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील एकूण १२ ठिकाणी आज छापे टाकले आहेत. यात मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या अहमदनगर मधील घरावर तसेच सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुणे येथील घरावर छापा टाकून सीबीआय टीमने झडती घेतली आहे. याशिवाय ठाणे, नाशिक, सांगली, अहमदनगर आणि पुणे येथे काल छापे टाकण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले. या कारवाईदरम्यान अनिल देशमुख प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे व इलेक्टॉनिक पुरावे हाती लागल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आल्याचेही सूत्रांनी नमूद केले.

Previous Post

कुरुल : रस्त्यासाठी आधी रक्तदान आता जागरण गोंधळ

Next Post

मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून, जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात

Next Post
मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून, जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात

मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून, जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group