• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रवादी पूरग्रस्त १६ हजार कुटुंबांना जीवनाश्यक वस्तू पुरवणार

Yes News Marathi by Yes News Marathi
July 27, 2021
in इतर घडामोडी
0
राष्ट्रवादी पूरग्रस्त १६ हजार कुटुंबांना जीवनाश्यक वस्तू पुरवणार
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : राज्याला पावसाचा फटका बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आढावा घेतला आहे. महाराष्ट्राला अशा संकटांचा अनुभव आहे सांगताना शरद पवार यांनी पूरस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करणार अशी माहिती दिली आहे. दरम्यान एकूण १६ हजार कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे, अशी माहिती देताना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवारांनी यावेळी नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरै टाळावेत असं आवाहनही केले .“सहा ते सात जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे. सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर, रायगड अशा एकूण सात जिल्ह्यांसहित अन्य जिल्ह्यातही नुकसान झालं आहे. त्यांना मदत करण्याची गरज आहे. पूरस्थिती अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करुन जबाबदारी घेईल,” असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.“महाराष्ट्राला अशा संकटांचा अनुभव आहे. माळीणमधील दुर्घटनेनंतर सरकार आणि स्थानिक नेते यांनी पुनर्वसन केले होते . पुनर्वसन कसे करतात याचा अनुभव घेतला,” असे शरद पवारांनी सांगितले . तसेच १६ हजार कुटुंबांना पुराचा फटका बसल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. “१६ हजार कुटुंबांची माहिती मिळाली आहे. चिपळूण, खेडमधील पाच हजार; रायगड महाडमधील पाच हजार, कोल्हापुरातील दोन हजार, सातारामधील एक हजार आणि सांगलीतील दोन हजार लोकांना फटका बसल्याचे त्यांनी सांगितले . “राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना भांडी, कपडे, अंथरुण अशा जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय वैद्यकीय पथके पाठवणार आहोत. येत्या दोन ते तीन दिवसांत ही मदत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” अशी माहिती शरद पवारांनी दिली.शरद पवार यांनी यावेळी नेत्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करु नये असे आवाहन केले . “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तिथे गेलच पाहिजे. नेमकी वस्तूस्थिती काय आहे याचा आढावा त्यांनी घेतलाच पाहिजे. पण इतरांनी जाऊ नये. मी गेलो तर यंत्रणेतील लोक माझ्याभोवती जमा होतील. यामुळे ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यावरुन लक्ष विचलित होईल,” असं शरद पवार म्हणाले . “माझा पूर्वीचा अनुभव आहे. विशेषतः लातूरचा. कारण नसताना अनेक लोक अशा ठिकाणी दौरे करतात. माझ अशा सर्वांना आवाहन आहे की, पूरग्रस्त भागात शासकीय यंत्रणा, स्थानिक संस्था आणि कार्यकर्ते पूनर्वसनाच्या कामामध्ये लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यांचे लक्ष विचलित होईल, अशा पद्धतीचे दौरे टाळण्याचा प्रयत्न करा. मला आठवते की, लातूरला असताना आम्ही कामात होतो. त्यावेळी पंतप्रधान नरसिंहराव पाहणीसाठी येणार होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना फोन केला आणि त्यांना येऊ नका , अशी विनंती केली. दहा दिवसांनी या असे त्यांना म्हणालो. तुमच्या इथली यंत्रणा तुमच्याभोवती केंद्रीत होईल असे त्यांच्या निदर्शनास आणून दिले . त्यांनीही दौरा रद्द केला”, असे सांगत पवार यांनी पूरग्रस्त भागात दौरे न करण्याचे आवाहन राजकीय नेत्यांना केले .

Previous Post

उद्याच्या बजेटमध्ये परिवहन कर्मचाऱ्यांच्या पगारसाठी तरतूद करावी

Next Post

अजित पवार यांच्याकडून उपाययोजनांचा मास्टर प्लान जाहीर

Related Posts

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…
इतर घडामोडी

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
Next Post
अजित पवार यांच्याकडून उपाययोजनांचा मास्टर प्लान जाहीर

अजित पवार यांच्याकडून उपाययोजनांचा मास्टर प्लान जाहीर

ताज्या बातम्या

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026