रायगड : काँग्रेसचे खंदे समर्थक आणि अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते. महत्त्वाचं म्हणजे आजच म्हणजे 15 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे.
माजी आमदार मधुकर ठाकूर हे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून आजारी होते. मधुकर ठाकूर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला ग्राम पंचायतीपासून सुरुवात केली. अलिबागमधील तत्कालिन झिराड ग्रामपंचायती सदस्य म्हणून ते निवडून आले होते. तिथून त्यांनी जिल्हा परिषद आणि मग थेट विधानसभेपर्यंत मजल मारली.










