येस न्युज मराठी नेटवर्क : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. मात्र नव्याने आढळलेल्या डेल्टा प्लस कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे चिंतेचे वातावरण आहे. डेल्टा प्लस मुळे तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले. गेल्या २४ तासात ५१ हजार ६६७ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर १३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी देशात ५४ हजार ६९ करोना बाधित आढळले होते.आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ५१.६६७ नवीन करोनाचे रुग्ण आढळले. तसेच १,३२९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ६४,५२७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात ६,१२,८६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.