सोलापूर : महापालिकेचा covid-19 चा २१ जून रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे . रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात फक्त २ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. या कालावधीत २९ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे शहरातील २६ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक ३ आणि प्रभाग क्रमांक ६ मध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. इतर सर्व २४ प्रभागांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही.