३१८ कोरोनामुक्त,७ जणांचा मृत्यू
सोलापूर : जिल्ह्याचा covid-19 चा रविवार दिनांक २० जून चा अहवाल प्राप्त झाला आहे. शनिवारी रात्री बारा वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यामध्ये नवीन ३२३ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे . या कालावधीत ३१८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता सर्वाधिक माळशिरस तालुक्यात ९८ आढळले आहेत. उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येकी १ नवीन रुग्ण आढळला आहे.