सोलापूर : कुटुंब प्रबोधन आणि विविध सामाजिक संस्थांतर्फे सोमवारी २१ जून ते २७ जून या कालावधीत होणाऱ्या योग सप्ताहाची तयारी पूर्ण झाल्याचे प्राध्यापक देवानंद चिलवंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. योग सप्ताहाच्या कार्यक्रमात पतंजली योगपीठ, लोकमंगल बँक , लोकमंगल पतसंस्था, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर जनता सहकारी बँक, नेहरू युवा केंद्र , शिक्षण प्रसारक मंडळी संचलित हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर सोशल फाउंडेशन अशा विविध संस्था सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम ऑनलाइन होणार असून जिल्ह्यातील २५ हजार कुटुंबांनी सहभाग घ्यावा असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. योग सप्ताहात सहभागी होण्यासाठी संयोजक प्राध्यापक चिलवंत आणि योग सप्ताह प्रमुख अमोल देशपांडे यांच्याशी मोबाईल क्रमांक ९९२३४०४४०३ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.