• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

म्युकरमायकोसिस रूग्णांबाबत दक्ष रहा – पालकमंत्री

Yes News Marathi by Yes News Marathi
June 18, 2021
in मुख्य बातमी
0
म्युकरमायकोसिस रूग्णांबाबत दक्ष रहा – पालकमंत्री
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.18: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे, मात्र कोरोना होऊन गेल्यानंतर ओढवणाऱ्या म्युकरमायकोसिस रूग्णांबाबत प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

        नियोजन भवन  येथे कोरोना रुग्णांच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठकीत भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे,  वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

        पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अजूनही असल्याने यंत्रणेने आवश्यक काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांची पुन्हा तपासणी करावी. त्यांना म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण होणार नाही, याचे काटेकोर नियोजन करा. जिल्ह्यात 173 म्युकरमायकोसिसचे रूग्ण उपचार घेत असून त्यांना लागणारी औषधे, इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत. म्युकरमायकोसिस रूग्णांचा मृत्यू होणार नाही, याबाबतही दक्षता घ्याव्यात.

        जिल्ह्यात सध्या 2696 कोरोनाचे रूग्ण उपचार घेत असून त्यांना लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून द्या. कोरोना रूग्णांचा पॉजिटीव्हीटी दर 3.51 टक्के कमी होत असला तर मृत्यूदर वाढणार नाही, याची दक्षता घ्या. पंढरपूर, माढा, करमाळा आणि माळशिरस तालुक्यात यंत्रणेने दक्ष राहून काम करावे. या तालुक्यातील पॉजिटीव्हिटी दर कमी करण्याच्या सूचनाही भरणे यांनी दिल्या.

        संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत मुलांना संभाव्य धोका ओळखून तयारी करा. रॅपिड ॲन्टिजन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट वाढवून रूग्णसंख्या शून्यावर आणून जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणेने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

        जिल्ह्यात 89 हजार 849 बालकांची तपासणी करण्यात आली असून 1375 बालके जीवनसत्वाची कमतरता असलेल्या आजाराने बाधित असल्याचे आढळली. तसेच 46 कोविड सदृश बालकांपैकी 16 बालके पॉजिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्व सुस्थितीत आहेत. कुपोषित बालके, गरोदर माता आणि कोमॉरबिड रुग्ण, दुर्धर आजाराची बालके यांच्या घरातील १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे, असेही श्री. भरणे यांनी सांगितले.

         गरोदर माता, उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या नागरिकांना इन्फ्लूएन्झाचे लसीकरण करण्यात येणार असून उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण करून 1300 ऑक्सिजन बेड तयार करण्यात येणार आहेत. यातील 20 टक्के बेड बालकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाबाधित मुलांसाठी सर्व डीसीएच, डीसीएचसी आणि कोविड केअर सेंटरमध्ये बेड राखीव करण्यात आले आहेत. माझे मूल माझी जबाबदारी आणि माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत 224 तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत. पथकामार्फत 0 ते 18 वर्षे वयोगटातील नऊ लाख 77 हजार 932 बालकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
Previous Post

देशी, स्थानिक प्रजातींची झाडे लावा – पालकमंत्री भरणे

Next Post

सोलापूर शहरात नव्याने १० जणांना कोरोना

Related Posts

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
Next Post
सोलापूर शहरात नव्याने १० जणांना कोरोना

सोलापूर शहरात नव्याने १० जणांना कोरोना

ताज्या बातम्या

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026