सोलापूर : महापालिकेचा covid-19 शुक्रवार दिनांक अठरा जून चा अहवाल प्राप्त झाला आहे. गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात शहरांमध्ये नवीन १० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे या कालावधीत १७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत . कोरोनामुळे एका व्यक्तीच्या मृत्यू ओढवला आहे. मुळेगाव रोड येथील सर्वोदयनगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूनंतर या व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.