५ नवीन रुग्ण ८ जण कोरोनामुक्त
सोलापूर : शहराचा covid-19 चा १७ जून रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे. शहरातील २६ प्रभागांपैकी २२ प्रभागांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत कोरोनामुळे तिघांचा मृत्यू ओढवला आहे. सोलापूर शहरातील रुग्णालयांमध्ये सध्या फक्त १५६ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. शहरातील तीन मृतांपैकी दोघाना रुग्णालयात दाखल केल्यानंतर लगेचच मृत घोषित करण्यात आले होते. या दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे