सोलापूर : पोलीस आयुक्तालयाने ३ जून रोजी सोलापूर शहरात कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये २,३७८ वाहनांची तपासणी करून २,६४,७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने ३७५ व्यक्तींविरुद्ध कारवाई करीत १,८७,५०० रुपये दंड करण्यात आला. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याने ३३६ व्यक्तींविरुद्ध कारवाई करून ६९,२०० रुपये दंड वसूल करण्यात आला. नियमांचे उल्लंघन केल्याने ४ आस्थापनांना ८ हजार रुपये दंड करण्यात आला. महापालिका आयुक्तांच्या नवीन आदेशानुसार सोलापूर शहरात दुपारी तीन नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
