सोलापूर : जिल्ह्याचा covid-19 चा गुरुवार दिनांक ३ जून चा अहवाल प्राप्त झाला आहे. बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये ५४० नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. या कालावधीत ९१९ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. कोरोना बाधितांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता माळशिरस तालुक्यात नवीन १३४ व्यक्तींना तर पंढरपूर तालुक्यात नवीन ११९ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि सांगोला या दहा तालुक्यांमध्ये नवीन कोरोनाबाधितांची संख्या १०० पेक्षा कमी आहे.
