• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अक्कलकोट संस्थानच्या नैवेद्य आरतीने संपन्न झाला स्वामींचा पुण्यतिथी सोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
May 9, 2021
in मुख्य बातमी
0
अक्कलकोट संस्थानच्या नैवेद्य आरतीने संपन्न झाला स्वामींचा पुण्यतिथी सोहळा
0
SHARES
0
VIEWS

लॉकडाऊनच्या सावटाखाली वटवृक्ष मंदीरात साध्या पध्दतीने उत्सव संपन्न

अक्कलकोट : कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री स्वामी समर्थांचा १४३ वा पुण्यतिथी सोहळा कोणत्याही भाविकांविना अत्यंत शांत वातावरणात आज संपन्न झाला.  श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारे विविध धार्मिक कार्यक्रम यंदा कोरोनामुळे भाविकांची गर्दी टाळण्याकरिता रद्द करण्यात आले. 

        सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गांभीर्य पूर्वक काळजी म्हणून शासन व जिल्हाधिकारी साहेबांच्या निर्देशाचे  पालन करीत मंदिर समितीने पुढील आदेश येईपर्यंत भाविकांना स्वामींच्या दर्शनाकरीता मंदिर बंद ठेवले आहे. मंदिरातील नित्य पूजा व दिवसातील तीनही आरती चालू आहेत. या पाश्वभूमीवर आज रविवार दिनांक ९ मे रोजी पहाटे ५ वाजता श्रींची पुण्यतिथी महोत्सवाची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्तिथीत करण्यात आली. यानंतर मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते श्रीना लघुरुद्र अभिषेक करण्यात आले. सकाळी ११:३० वाजता देवस्थानची नैवेद्य आरती संपन्न झाली. दुपारी १२ वाजता अक्कलकोट संस्थानच्या वतीने मालोजीराजे  भोसले  यांचे हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्तिथीत पुरोहित मंदार पुजारी यांच्या मंत्रोच्चारात श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आले.

यानंतर सायंकाळी अक्कलकोट शहरातून प्रतिवर्षी संपन्न होणारा पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आला. अशा प्रकारे यंदाही कोरोनाच्या सावटाखाली संपन्न झालेले श्री स्वामी समर्थांचे  १४३ वे  पुण्यतिथी महोत्सव या ही वर्षी कोणत्याही भाविकांच्या अनुपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाले. या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त वटवृक्ष मंदीरास पुणे येथील लाईट डेकोरेटर्स पुंडलिक हगवणे यांच्या वतीने मिलिंद पोकळे व सहकाऱ्यांनी आकर्षक विद्युत रोषणाईची सेवा स्वामीं चरणी अर्पण केली आहे. या प्रसंगी मंदिरात मोजक्या संख्येने उपस्थित असलेले विश्वस्त सदस्य व सेवेकऱ्यांना मास्क व सॅनिटायजर वापरण्याची सक्ती करण्यात आली. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख, गणेश दिवाणजी, गिरीश ग्रामोपाध्ये इत्यादी उपस्थित होते. 

Previous Post

सोलापूर शहर व ग्रामीणसाठी ७५१ रेमडेसिविर

Next Post

हेमंत बिस्वा शर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री

Related Posts

दुर्दैव सिद्धेश्वर तलावाचे.. पुन्हा ही घटना आपण सारे गप्पच…!
मुख्य बातमी

दुर्दैव सिद्धेश्वर तलावाचे.. पुन्हा ही घटना आपण सारे गप्पच…!

October 29, 2026
पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी अनिवार्य …!
मुख्य बातमी

पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी अनिवार्य …!

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट 5 हजार रुपये जमा होणार; सर्व जाचक अटी रद्द…
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट 5 हजार रुपये जमा होणार; सर्व जाचक अटी रद्द…

October 29, 2026
भाजपला नडला ओव्हर कॉन्फिडन्स…! बदलावी लागणार रणनीती..
मुख्य बातमी

भाजपला नडला ओव्हर कॉन्फिडन्स…! बदलावी लागणार रणनीती..

October 29, 2026
बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट
मुख्य बातमी

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
मुख्य बातमी

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

October 27, 2026
Next Post
हेमंत बिस्वा शर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री

हेमंत बिस्वा शर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026