येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरात रविवारी आलेल्या अहवालानुसार नवीन ४४२ व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये २४८ पुरुष आणि १९४ महिलांचा समावेश आहे. आत्या ८४७ व्यक्तींचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. रॅपिड अंटीजन टेस्टमध्ये १५० तर rt-pcr टेस्टमध्ये २९२ व्यक्तींना कोरोना झाल्याचे दिसून आले. रुग्णालयातून घरी परत गेलेल्या व्यक्तींची संख्या २१० होती. शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात शहरातील तेरा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे सोलापूर शहरातील पेठा, अपार्टमेंट्स ,वस्ती, चौक आणि झोपडपट्ट्या अशा २६४ ठिकाणच्या व्यक्तींना कोरोना ची बाधा नव्याने झाली आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या बाधितांची संख्या सोलापूर शहरात ३७२३ आहे . कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये ६० वर्षापेक्षा कमी वयाच्या पाच व्यक्तींचा समावेश आहे.