येस न्युज मराठी नेटवर्क : उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे समशापुर येथील अवैध जुगार अड्ड्यावर छापा मारून तालुका पोलिस स्टेशनच्या पथकाने ९ लाख १५ हजार ७८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला व दहा आरोपींना विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. समाशापुर येथील शेतात मन्ना नावाचा जुगार खेळत असताना तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली आहे. शेतामध्ये जुगार खेळणाऱ्या दहा व्यक्तीविरुद्ध जमावबंदीचा आदेश मोडल्या बाबत देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मालामध्ये मोटारसायकल मोबाईल रोख रक्कम व कार आदींचा समावेश आहे. या प्रकरणी तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस अधिक तपास करीत आहेत.