येस न्युज मराठी नेटवर्क : मोहोळ तालुक्यातील कोरेगाव येथील बालाजी नाना भोई याने त्याचे सासरे मच्छिंद्र विक्रम भोई यांनी संतोष नगर बाळे येथे चार एप्रिल रोजी सत्तूर ने डोक्यात मारून जखमी केल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली आहे. बालाजी हा पत्नी बाळंत झाल्यामुळे तिला भेटण्यासाठी आला होता. परंतु बाळंतपणात मुल मरण पावले होते. बालाजी हा आई मावशी काका भाऊ व इतर नातेवाईकांना घेऊन पत्नीला भेटायला गेला असता पत्नीने त्याच्या बरोबर सासरी येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर बालाजी भोई सर्व नातेवाईकांना घेऊन गाडीतून आपल्या गावी परतत असताना मच्छिंद्र भोई यांनी बाळे येथे गाडी समोर रिक्षा आडवी घालत जावयाला गाडीच्या बाहेर खेचून सत्तुर ने हल्ला केला होता. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दराडे अधिक तपास करीत आहेत.