सोलापूर : Covid-19 च्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे नियमित नोंद व अहवाल सादरीकरणासाठी तसेच कोविड कोदड टेस्टिंग च्या सुलभतेसाठी विकास सहकारी बँकेतर्फे येथील दाराशा हॉस्पिटल ला चार संगणक संच भेट देण्यात आले. या हॉस्पिटल चे प्रमुख डॉक्टर सुहासिनी वाळवेकर यांनी त्याचा स्वीकार केला. यावेळी विकास बँकेचे माजी अध्यक्ष सीए राज मिणियार डॉ.नवनीत तोष्णीवाल , राजेंद्र आसावा , मनीष बलदवा व रोहन राठी उपस्थित होते.