सोलापूर : शहर आणि जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने आज पासून दररोज सकाळी सात ते संध्याकाळी सात याच वेळेत सुरू राहतील. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये शनिवार आणि रविवार सर्व प्रकारची दुकाने हॉटेल रेस्टॉरंट बार बंद राहणार आहेत भाजीपाला दूध मेडिकल इमर्जन्सी सर्विसेस यांच्यावर मात्र निर्बंध नाहीत. नागरिकांना शनिवार आणि रविवारी सकाळी फिरता येईल तसेच दिवसभर फिरता येईल इमर्जन्सी सर्व्हिसेस वगळता सर्व प्रकारची दुकाने उद्या आणि परवा बंद राहतील अशी माहिती महापालिकेच्या आयुक्त पी शिवशंकर यांनी एस न्युज मराठी बोलताना दिली. नागरिकांनी नियम पाळावे गर्दी करू नये असे आवाहन देखील महापालिका आयुक्तांनी केली आहे.