• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तोडून नाही, हात जोडून करणार वसूली

Yes News Marathi by Yes News Marathi
March 3, 2021
in मुख्य बातमी
0
तोडून नाही, हात जोडून करणार वसूली
0
SHARES
0
VIEWS

बारामती, दि. ३ मार्च, २०२१- पुढील आदेश येईपर्यंत वीज जोडणी तोडणी थांबवण्याचे निर्देश महावितरण प्रशासनाने दिल्याने क्षेत्रीय कार्यालयांनी तोडून नाही, तर हात जोडून वसुली करण्याचा फंडा अवलंबला आहे. बारामती परिमंडलात ज्या ६१२ गावांमध्ये ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम राबवला आहे, त्या गावात शेतीपंपाच्या वसुलीला शेतकरी स्वत:हून प्रतिसाद देत आहेत. त्या जोरावरच महावितरणने ९१ कोटींचा टप्पा सुद्धा गाठला आहे. शिवाय गावातून वसूल झालेल्या ३३ टक्के रकमेतूनही विजेची कामे तातडीने करण्यास व प्रलंबित कृषी जोडण्या देण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. दोन महिन्यात ७ हजार ८९६ कृषी जोडण्या देण्यात आल्या आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून बारामती परिमंडलात ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. नियोजनपूर्वक गावात जाऊन तेथील ग्रामस्थांच्या विजेच्या समस्या, वीजबिलाच्या तक्रारी निवारण्याचे काम या उपक्रमाने केले आहे. याची पोचपावती म्हणून या ६१२ गावांमध्ये ‘महा कृषी ऊर्जा अभियानां’तर्गत वीजबिल वसुलीला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. हे अभियान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरणतर्फे गावात शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन, त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मिळणाऱ्या सवलतीची माहिती दिली जात आहे. एकूण थकबाकीच्या साधारणत: ६६ टक्के इतकी सवलत थकीत बिलावर मिळत आहे.

बारामती परिमंडलात आतापर्यंत ५६ हजार ३८९ शेतकऱ्यांनी थकबाकी व चालूबिलापोटी ९१ कोटी ३८ लाखांचा भरणा केला त्यांना सवलतीपोटी तब्बल ६८ कोटी ५४ लाखांची माफी मिळालेली आहे. मार्च महिन्यात वीज न तोडता वसुलीला गती देण्यासाठी मुख्य अभियंता पावडे यांनी सर्व वीज कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ज्या गावातील शेतकऱ्यांनी वीजबिलाचा भरणा केला आहे, तिथे ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार रोहित्र दुरुस्ती, क्षमता वाढवणे, नवीन कनेक्शन देणे यांसह यंत्रणेच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्यास सांगितले आहे. वसुलीच्या ‘कृषी आकस्मिक निधी’तून काम करण्यासाठी नामिकाप्रविष्ठ ठेकेदारांना कामे दिली जात आहेत. त्या-त्या गावात अशी कामे सुरु झाल्याने शेतकऱ्यांनीही ‘माझे वीजबिल, माझी जबाबदारी’ म्हणत आपले कर्तव्य पार पाडण्यास सुरुवात केली आहे.

· एकाच रोहित्रावरील ८ शेतकऱ्यांनी भरले साडेपाच लाख

भोर तालुक्यातील भांबवडे गावच्या गरुड रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांनी बुधवारी एकत्र येत त्यांच्या १२ लाख रुपये थकबाकीपोटी साडेपाच लाखांचा एकरकमी भरणा केला. त्यांचे ६.५ लाख माफ झाले. त्याबरोबरच त्यांच्या रोहित्राची संपूर्ण दुरुस्तीचे काम गुरुवारी करण्यात येणार आहे. तसेच अतिरिक्त भारापोटी नवीन रोहित्राचेही नियोजन केले जाणार आहे. महावितरणच्या या तत्परतेबद्दल सर्व शेतकऱ्यांनी महावितरणला धन्यवाद दिले आहेत.

मंडल/परिमंडल सोलापूर मंडल

१गाव, १ दिवस उपक्रमातील गावे २३६

दोन महिन्यांत दिलेल्या कृषी जोडण्या २४७२

दोन महिन्यांत झालेली वसूली (रु. कोटी) ११.६१

Previous Post

राहुल गांधी माफी मागता – मागता थकून जातील पण..चंद्रकांत पाटलांची गंभीर टीका

Next Post

विमानसेवा सुरु होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न हवेत – खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

Related Posts

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’
मुख्य बातमी

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!
मुख्य बातमी

कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!

August 29, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !
मुख्य बातमी

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
Next Post
विमानसेवा सुरु होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न हवेत  – खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

विमानसेवा सुरु होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न हवेत - खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

ताज्या बातम्या

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026