येस न्युज मराठी नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुकाध्यक्ष अडवोकेट दीपक पवार यांची उचलबांगडी केल्यामुळे राष्ट्रवादीतील खदखद समोर आली आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तालुका अध्यक्ष पदाची केलेली निवड रद्द करण्याची मागणी आता केले आहे.आगामी विधानसभा आणि विठ्ठल साखर कारखाना या दोन्ही निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे . राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या चालू असलेल्या वादाचे पडसाद आगामी विधानसभा आणि विठ्ठल कारखाना या दोन्ही निवडणुकीत निश्चितच उमटतील अशी शक्यता राजकीय गोटातून व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट गणेश पाटील यांनी सांगितले की., काही लोक पक्षाला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत