सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेच्या १७ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना मंगळवारी चिन्हांचे वाटप होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी सांगितले. सोलापूर शहराच्या २५ किलोमीटर परिसरातून निवडल्या जाणाऱ्या दहा जागांसाठी ४७ अर्ज अवैध ठरले होते . त्यातील १९ जणांनी माघार घेतल्याने आता दहा जागांसाठी 28 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. 25 किलोमीटर बाहेरील मतदारसंघातून निवडल्या जाणाऱ्या चार जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. महिला मतदार संघातील दोन जागांसाठी चार उमेदवार शिल्लक राहिले आहेत. २४ मार्चला मतदान होणार असून १६ मार्चला मतमोजणी होईल सोलापूर जनता सहकारी बँकेचे ५३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.