सोलापूर : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये कृषी क्षेत्रावर गेल्या काही वर्षांपासून येत असलेल्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून एक रकमी तडजोड योजना आणली आहे .ज्या शेतकरी कर्जदारांची शेती कर्ज 31 3 20 20 रोजी झालेली आहेत व ज्यांच्याकडे दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बाकी येणे आहे, अशी सर्व कर्ज खाते या योजनेसाठी पात्र आहेत. या विशेष योजनेअंतर्गत दहा लाखापर्यंत चे कर्ज बाकी असणारे सर्व शेतकरी पुन्हा बँक ऑफ महाराष्ट्र कडून कर्ज मिळण्यास पात्र ठरणार आहेत , हे या योजनेचे चे वैशिष्ट्य आहे. या योजनेअंतर्गत संचित व्याज पूर्णपणे माफ केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी गृह कर्ज वाहन कर्ज घेतलेले आहे त्यांना देखील बँकेच्या नियमानुसार सूट देण्यात येणार आहे . सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन विभागीय व्यवस्थापक सुनिता भोसले आणि विभागीय उपव्यवस्थापक हेमंत महाजन यांनी केले आहे.