येस न्युज मराठी नेटवर्क : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या मास्कची किंमत हि एखाद्याच्या घराच्या इएमआय पेक्षाही जास्त आहे.दीपिका तिच्या अभिनयाने सगळ्यांची मने तर जिंकतेच शिवाय तिचा फॅशनसेन्सदेखील चाहत्यांना नेहमीच पसंत पडतो. तिची स्टाइल नेहमी इतरांपेक्षा हटके असते. यावेळेस दीपिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहेत. त्या फोटोंच्या ट्रेण्ड होण्यामागेही एक खास कारण आहे. या फोटोमध्ये दीपिकाने काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. कपड्यांबाबतीत दीपिकाचा आवडता रंग काळा आहे. ती प्रत्येक खास क्षणी काळ्या रंगांच्या कपड्यांमध्ये दिसते. आताही तिने काळ्या रंगाला प्राधान्य दिले आहे. यासोबतच तिने करोनापासून सुरक्षेसाठी काळ्या रंगाचा मास्कदेखील घातला आहे. सर्वसाधारण दिसणारा हा मास्क दीपिकाला ट्रेण्डमध्ये आणण्यासाठी मदत करत आहे. कारण, जो मास्क दीपिकाने घातला आहे, तो मास्क थोडाथोडका नाही तब्बल २५ हजार रुपयांचा आहे.