येस न्युज मराठी नेटवर्क : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात जोशीमठजवळ रविवारी नंदादेवी हिमनदीचा एक भाग तुटल्यानं हिमस्खलन होऊन अलकनंदा नदीच्या खोऱ्यात अचानक महापूर आला. महापुराच्या तडाख्यात विद्युत प्रकल्प वाहून गेले . या भागातून आतापर्यंत १४ मृतदेह हाती लागले आहेत. या संकटामुळे राज्यात सन २०१३ मध्ये झालेल्या भीषण ढगफुटीच्या स्मृती ताज्या झाल्या.- तपोवन बोगद्यात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या बोगद्यात जवळपास ३० जण अडकलेले आहेत. जलप्रलयामुळे हा संपूर्ण बोगदा मलब्यानं भरलेला आहे. जवळपास ३०० जवान या बोगद्यातील मलबा बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर करत आहेत.