महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी 1 सप्टेंबरपासून शासनाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. या प्रवाशांना सवलतीचे तिकीट एनसीएमसी कार्डच्या माध्यमातूनच देण्यात येणार आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेणाऱ्या संबंधित प्रवाशांनी प्रवासाच्या वेळी एनसीएमसी कार्ड सोबत ठेवावे, तसेच कार्डमध्ये आवश्यक रक्कम टॉप-अप करून ठेवावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
MSRTC कडून मिळालेल्या माहितीनुसार, या कार्डसाठी आतापर्यंत सुमारे १.११ कोटी प्रवाशांची NCMC कार्डसाठी नोंदणी करण्यात आली आहे. कार्डची नोंदणी आणि वितरणाची जबाबदारी महामंडळाने E-Bix Technologies Ltd या कंपनीकडे सोपवली आहे. सध्या या प्रक्रियेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले असून, सरकारी सवलतीसाठी पात्र असलेल्या इतर प्रवर्गांचाही पुढील टप्प्यात NCMC प्रणालीमध्ये समावेश केला जाणार आहे.
- १ सप्टेंबरपासून महिला आणि ६५ ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्ध्या तिकिटाच्या सवलतीसाठी NCMC कार्ड अनिवार्य.
- NCMC कार्ड नसल्यास पात्र प्रवाशांकडून पूर्ण तिकीट भाडे आकारले जाऊ शकते.
- ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सध्या NCMC कार्डच्या सक्तीपासून दिलासा देण्यात आला.








