सोलापूर : महापालिकेची गेल्या आठवड्यात अर्धवट तहकूब झालेली अर्थसंकल्पीय सभा आज होत आहे 41 कोटी रुपयांच्या निधीवरून नगरसेवकांमध्ये वादावादी झाली त्यामुळे सभा तहकूब करण्याची नामुष्की भाजपवर ओढावली होती आता या सभेत वादावादी होऊ नये म्हणून हा निधी सर्व नगरसेवकांना समसमान वाटण्यावर एकमत झाले आहे यासंदर्भात सर्वपक्षीय गटनेत्यांची महापौरांनी बैठक घेतली त्यावर एकमत झाले आहे त्यामुळे आजच्या सर्वसाधारण आजच्या अर्थसंकल्पीय तब्येत बजेट मांडले जाईल आणि ते मंजूर केले जाईल अशी आशा आहे दरम्यान या सभेला जास्त गोंधळ होऊ नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त महापालिकेत लावण्यात आला आहे महापालिकेचे आयुक्त शिवशंकर यांनी सन 2021 -22 या वर्षाकरता 709 कोटी रुपयांचे बजेट मनपा सभेकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवले आहे