स्व.विष्णुपंत कोठे यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त ५ ते १० ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रम

0
27

विष्णुपंत कोठे मेमोरियल इंग्लिश स्कूल, सोलापूर.
सोलापूर : ७०फूट रोड वरील, विष्णुपंत कोठे मेमोरियल स्कूल येथे स्व. विष्णुपंत कोठे यांच्या ८५ व्या जयंती निमित्त ५ ऑगस्ट २०२२ ते १०ऑगस्ट २०२२पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आज दंत तपासणी व नेत्र तपासणी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निर्मलकुमार काकडे व रमेश यन्नम उपस्थित होते.

मार्कंड्य सहकारी रुग्णालयाचे डॉ. अमित पोरेडी, डॉ. क्षमा कदम, डॉ. विनय चव्हाण, डॉ.भाग्यश्री रोडगे, डॉ. नेहा मुस्तारे आणि त्यांचे टीम डॉ. सौरभ इंगळे, डॉ. झाझेबा सय्यद, प्रशालेच्या प्राचार्या पुष्पा नायर मॅडम यांच्या हस्ते,सरस्वती मातेला,स्व. श्री विष्णुपंत कोठे व स्व. श्री राजेश अण्णा कोठे यांच्या प्रतिमेला हार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच आत्मतृप्ती योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या गरीब -गरजू व वयस्कर लोकांना अन्न देण्यात येते त्या डब्याचं मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींची व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची दंत तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली. दातांची व डोळ्यांची कशी निगा घ्यावी समजावून सांगितले. या शिबिराला विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले